मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना राज्य सरकारनं 70 कोटींचा भूखंड फक्त 1.75 लाख रुपयांना दिला आहे. असा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. हेमा मालिनी यांच्या डान्स अॅकेडमीसाठी मुंबईतल्या ओशीवारा भागामध्ये हा भूखंड देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनं 2 हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड 87.50 रुपये प्रती स्क्वेअर मीटरनं दिल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. 


ओशिवारामधल्या हा भूखंडासाठी हेमा मालिनी यांनी आधीच 10 लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारला हेमा मालिनी यांना 8.25 लाख रुपये परत द्यावे लागणार आहेत. 


याआधीही हेमा मालिनी यांना 35 रुपये प्रती स्क्वेअर मीटर दरानं भूखंड देण्यात आला होता. पण यावरून वाद झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून भूखंड वितरीत करण्याच्या योजनेमध्ये बदल केले.