नागपूर : नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात आज नागपुरात नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांमध्ये मतदान घेण्यात आलं. नागपूरातल्या नऊ नगर पालिकांमध्ये सरासरी साठ टक्के मतदानाची नोंद झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर गोंदिया आणि तिरोडा नगरपालिकांमध्येही मतदारांमध्ये सकाळी फारसा उत्साह बघायला मिळाला नाही. पण दुपानंतर मतदान केंद्रावर रांगा वाढल्या. गोंदियात साडे पाच पर्यंत सुमारे 65 टक्के तर तिरोड्यात 73.15 टक्के मतदानाची नोंद झालीय. सोमवारी सकाळी 10 वाजता सगळ्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.