रजेवर आलेल्या लष्करी जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या
रजेवर आलेल्या सैनिकाने स्वत: छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना महाड शहरात उघडकीस आली आहे.
महाड : रजेवर आलेल्या सैनिकाने स्वत: छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना महाड शहरात उघडकीस आली आहे.
राजेश बाळकृष्ण पिलावरे (३२) असे त्याचे नाव असून ते पंजाब येथे सेवेत होते. 10 ऑक्टोबरपासून रजेवर आले होते. त्यांची माहेरी गेलेली पत्नी आज घरी आली. मात्र, घराचा दरवाजा उघडत नाही म्हणून तिने अन्य लोकांना सांगितले. त्यानंतर घराचा दरवाजा तोडण्यात आला.
घरात प्रवेश करताच समोरचे दृश्याने अंगावर काटे उभे राहिले. राजेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला. राजेशच्या आत्महत्येचे कारण अद्ध्याप समजू शकलेले नाही. या घटनेची महाड शहरात चर्चा आहे.