विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीचा सेना-भाजप युतीच्या उमेदवाराला पाठिंबा
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
शिवसेनेचे उपनेते उस्मानाबाद जिल्ह्यातील तानाजी सावंत हे युतीचे उमेदवार असून त्यांचाविरोधात राष्ट्रवादीच्या समर्थनाने निवडणूक रिंगणात असलेले संदीप बाजोरीया यांनी माघार घेत सावंत यांना पाठिंबा घोषित केला.
त्यामुळे भाजप सेना आणि राष्ट्रवादी युतीच्या तानाजी सावंत यांची थेट लढत काँग्रेसचे शंकर बडे यांच्याशी होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड, उर्जाराज्यमंत्री मदन येरावार, माजी मंत्री मनोहर नाईक यांचे उपस्थितीत संदीप बाजोरीया यांनी यवतमाळला काँग्रेस मुक्त करण्यासाठी भाजप सेनेसोबत जात असल्याचे सांगितले.
भाजप सेनेच्या नेत्यांमुळे आपण आमदार झालो होतो ते ऋण आता फेडत असल्याचे स्पष्ट करतांनाच सातारा, सांगली, पुणे येथे युतीची मदत राष्ट्रवादी काँग्रेसला होईल असे सांगितले.