चंद्रपुरात बिबट्याचा मृतदेह
चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी वनपरिक्षेत्रात एका नर बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय. कोठारी गावाशेजारी असलेल्या दिगंबर नगराळे यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी वनपरिक्षेत्रात एका नर बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय. कोठारी गावाशेजारी असलेल्या दिगंबर नगराळे यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय.
पिकाची काढणी झाल्यामुळे नगराळे गेल्या काही दिवसांपासून शेतात आले नव्हते, मात्र ते बुधवारी दुपारी ते शेतात आले असता त्यांना विहिरीत बिबटा मेलेला अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार या बिबट्याचा मृत्यू ५ ते ६ दिवस आधी झाला असून एखाद्या सावजाचा पाठलाग करतांना हा बिबट्या विहिरीत पडून मृत झाला असावा असं समजतय.