लोणावळा : पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना अत्याधुनिक लिफ्टची योजना तयार करण्यात येत आहे. या लिफ्टमधून एकाचवेळी 20 भाविक दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लिफ्टमुळे वयस्कर आणि दिव्यांग व्यक्तीनाही आता देवीच्या दर्शनासाठी जाता येणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पायवाटेतील पाय-या वळणाच्या ठिकाणी धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे एकविरा देवी मंदिर न्यास चांगला मार्ग तयार करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.


केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य वनविभागाच्या आडमुठेपणामुले भाविकांची गैरसोय होत होती. हि गैरसौय आता या लिफ्टमुळे दूर होणार असल्याची माहिती एकविरा देवी मंदिर न्यासाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिलीय.