रायगड : महाडमध्ये बचावकार्याला वेग आलाय. आत्तापर्यंत दोन मृतदेह सापडलेत. दासगावजवळ हे मृतदेह सापडलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गावरचा महाडजवळचा सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्यानंतर नौदलाची दोन आणि तटरक्षक दलाची दोन अशा चार विमानांच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. एनडीआरफच्या तीन पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.


शोध सुरूच... 


जवळपास १६० जवान १२ बोटींच्या मदतीनं बचतकार्यात सहभागी झालेत. नौदलाचे पाणबुडेही या बचावकार्यात सहभागी झालेत. वाहून गेलेल्या एसटी बसेसचा आंबेतच्या खाडीपर्यंत शोध घेतला जातोय.


मंगळवारी रात्री उशीरा ११ वाजल्याच्या सुमारास महाडचा ब्रिटिशकालीनं पूल पुरात वाहून गेलाय. या दुर्घटनेत वाहून गेलेल्या राजापूर-बोरिवली (एमच-४० एन ९७३९), जयगड-मुंबई (एमच-२० बीएल- १५३८) या दोन बसेस अजूनही बेपत्ता आहेत. यामध्ये सुमारे २२ प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. 


बचाव कार्यासाठी नेव्हीचे हेलिकॉफ्टर्स, कोस्ट गार्ड आणि एनडीआरएफच्या चार तुकड्या घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यासाठी, एनडीआरएफच्या मुंबईतून दोन आणि पुण्यातून दोन टीम पाठवण्यात आल्यात. सावित्री नदीवर अजूनही पूर सदृश्य परिस्थिती कायम आहे.


मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ राजेवाडी इथं सावित्री नदीवर ब्रिटीशकालीन हा पूल होता. दरम्यान पूल वाहून गेल्यानं मुंबईकडे येणारी वाहतूक कशेडी बायपासमार्गे वळवण्यात आलीय.


मदतीसाठी संपर्क साधा... 


महाड दुर्घटना : एसटी बसप्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन - ०२१४१/२२२११८ किंवा टोल फ्री क्रमांक १०७७