पुणे : नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याचा मतमोजणीत आता चित्र हळहळू स्पष्ट झालं आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला तर लातूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीनं नगराध्यक्षपद राखलंय पण त्यांच्या बालेकिल्ल्यात तडा गेला आहे. भाजप प्रणित आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी काठावर यश मिळवलंय. राष्ट्रवादीच्या कडव्या लढतीनंतर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंकिता शहा विजयी झाल्या आहेत.


तळेगावत भाजप आघाडीला घवघवीत यश मिळवलंय. लोणावळ्यातही भाजपचाच विजय झाला आहे. शिवसेनेला दुसऱ्या क्रमाकावर समाधान मानवं लागलंय. आळंदीत सत्तांतर झालंय. भाजपनं शिवसेनेला धुळ चारली आहे. शिरुरला स्थानिक आघाडीनं भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णेंना मोठा धक्का दिला आहे. तिकडे जुन्नरमध्ये राष्ट्रवादीची पिछेहाट झाली असून त्यांची जागा शिवसेनेनं घेतली आहे. दौंडमध्ये स्थानिक आघाड्यांची चुरस होती. त्यानुसार नागरी हितसंरक्षक मंडळ पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.