महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकन
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे जीआय म्हणजेत जॉबरिकल इंडेक्स नामांकन मिळालं आहे. त्यामुळे १२ देशात महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला बाजारपेठ उपलब्ध झालं आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे जीआय म्हणजेत जॉबरिकल इंडेक्स नामांकन मिळालं आहे. त्यामुळे १२ देशात महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला बाजारपेठ उपलब्ध झालं आहे.
समुद्र सपाटीपासून ४५०० फुट उंचीवर असलेल्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणातील हवेतील आर्द्रता कमी असल्याने या हवामानातील उत्पादित केलेल्या स्ट्राबेरीची दर्जा अत्यंत उच्च प्रतीचा असतो हे सिद्ध झालं आहे. महाबळेश्वरच्या स्ट्राबेरीत आंबट, गोड चव आणि रसरशीतपणा इतर कुठेही आढळत नाही. आता आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्याने ग्राहकांची फसवणूक होणार नाही. आतापर्यंत बाजारात इतर ठिकाणची स्ट्रॉबेरी महाबळेश्वर स्ट्रॉबेरी म्हणून विकली जात होती. त्यामुळे अखिल भारतीय स्ट्रॉबेरी उत्पादक महासंघाने महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला राष्ट्रीय दर्जाचे जीआय अर्थात जॉबरिकल इंडेक्स मानांकन दिलं आहे.
जीआय नामांकनामुळे जगभरात महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला बाजारपेठ उपलब्ध झालीय. त्यामुळे शेतक-यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. यावर्षी महाबळेश्वर तालुक्यातील २८ गावात २ हजार ५०० एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीचं विक्रमी उत्पादन झालं असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. आता जीआय मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात महाबळेश्वर स्ट्रॉबेरी हा ब्रँड होईल यात शंकाच नाही.