मुंबई : महाड दुर्घटनेत एकूण ४२ जण बेपत्ता आहेत. यापैकी १२ मृतदेह हाती सापडलेत आहेत. दुसऱ्या दिवशी हे मृतदेह सापडलेत. उद्या तिसऱ्या दिवशी पुन्हा बचत कार्य सुरु ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मृतांच्या नातेवाईंकाना ५ लाख रुपयांची मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मृतांची नावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. प्रभाकर शिर्के - संगमेश्वर ( राजापूर-बोरीवली बस वाहक)
२. सुनील बैकर (जयगड-मुंबई बसचे प्रवाशी)
३. रमेश कदम (राजापूर-बोरीवली बसचे प्रवासी)
४. प्रशांत माने
५. स्नेहल बैकर
६. आवेश आल्ताफ चौगुले, चिपळूण (राजापूर-बोरीवली बसचे प्रवासी)
७. पांडुरंग घाग
८. शेवंती मिरगल (हरिहरेश्वर येथे)
९. संपदा संतोष वाजे (केंभुर्ली येथे)
१०. चालक श्रीकांत एस. कांबळे (जयगड-मुंबई एसटी) तसेच दोघांची ओळख पटलेली नाही.


ST चालक कांबळे यांचा मुलगाही बेपत्ता


जयगड- मुंबई एसटी बसचे चालक एस.एस. कांबळे यांचा मृतदेह आंजर्ले समुद्रकिनार्‍यावर सापडला. धक्कादायक म्हणजे या बसमधील त्यांचा धाकटा मुलगा महेंद्र (17) बेपत्ता आहे.  कांबळे यांनी मुलासाठी विनंती करून मुंबईची ड्यूटी मागितली होती, असे मिलिंद कांबळे (मोठा मुलगा) याने सांगितले.  


हे आहेत अद्याप बेपत्ता


राजापूर-बोरीवली एसटीचे चालक गोरखनाथ सीताराम मुंढे (40, रा. अंतरवेली-बडवली, ता.चिपळूण), तसेच आनिश मेमन चौगुले ( काविळतळी, ता. चिपळूण), बाळकृष्ण बाब्या वरक (21, रा. नाणार, ता.राजापूर), इस्माईल वाघू (भांबेड, ता. लांजा), अनंत विठ्ठल मोंडे (65, रा. कुंभवडे, बाणेवाडी ता. राजापूर), जयेश बाणे (36, रा. सोलगाव, ता. राजापूर), अजय सीताराम गुरव (40, रा.ओणी, ता. राजापूर), विजय विक्रम पंडित (40, रा. सोनगिरी, ता. संगमेश्वर), विनिता विजय पंडित (35, रा. सोनगिरी, ता.संगमेश्वर), गणेश कृष्णा चव्हाण (42), पांडुरंग बाबू घाग (55, दोघेही रा. दोणवली, ता. चिपळूण), रमेश गंगाराम कदम (30, रा. नांदीवसे, ता. चिपळूण), गोविंद सखाराम जाधव (65, रा. दळवटणे, ता. चिपळूण), भिकाजी वाघधरे (79, रा. जैतापूर, ता. राजापूर) हे प्रवासी. या व्यतिरिक्त आणखी दोन ज्येष्ठ नागरिक राजापूर-बोरीवली एसटीमध्ये राजापूर येथे बसल्याची माहिती आहे.


मिरगल कुटुंबीय बेपत्ता, दोन मृतदेह हाती


गुहागरच्या तहसिलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या तालुक्यातील असलेले आणि मुंबईत राहाणारे मिरगल कुटुंबीय तवेरा या खासगी गाडीने (एमएच 04 –7837)  गुहागरहून मुंबईकडे निघाले होते. जयवंत सखाराम मिरगल ( 40), बाबा सखाराम मिरगल (36), जयवंती सखाराम मिरगल (70, तिघेही रा.वाकोला, सांताक्रुझ, दत्त मंदिर, मुंबई), दत्ताराम भागोजी मिरगल (61, रा.छप्परपाडा, सानपाडा, नवी मुंबई), संपदा संतोष वाजे (37), संतोष सिताराम वाजे (40, दोघेही रा.अमृतनगर, गणपती मंदिराजवळ, घाटकोपर, मुंबई), आदीनाथ कांबळे ( 45, रा.जोगेश्वरी, मुंबई), दिनेश सखाराम कांबळे (40, रा.बोरीवली, मुंबई) या गाडीच्या चालकाचे नाव समजलेले नाही.