महाड : पोलादपूर-महाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष विसावा हॉटेलजवळ सापडले. नौदलाच्या शोधपथकाच्या हाती  एसटीचे अवशेष लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महिलांसाठी राखीव' असं या पत्र्यावर लिहिलेलं आहे. पुलापासून ३ किलोमीटर अंतरावर हा पत्रा सापडलाय. याचबरोबर एसटीसह इतर गाड्यांचेही अवशेष सापडलेत. चार दिवसानंतरच्या अथक शोधमोहिमेनंतर आज नौदलाच्या शोधपथकाला हे यश आले आहे.


महाड पूल दुर्घटना प्रकरणी, सकाळपासूनच भारतीय नौदलानं शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु केली आहे. पाणबुडीच्या माध्यमातूनही शोध घेतला जात आहे.  महाड जवळील दुर्घटनेनंतर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. वेगवेगळया संस्था संघटनाही यात मागे नाहीत.