महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह सापडले
सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत दोन एसटी आणि काही कार वाहून गेल्या होत्या. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 32 वर पोहोचलाय. आज आणखी दोन मृतदेह सापडले.
मुंबई : सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत दोन एसटी आणि काही कार वाहून गेल्या होत्या. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 32 वर पोहोचलाय. आज आणखी दोन मृतदेह सापडले.
याआधी तवेरा कारचा सांगडा काढण्यात यश आले. या कारमध्ये दोन मृतदेह सापडले होते. आज आखणी 3 मृतदेह आज हाती लागलेत. यामधील दोन मृतदेह हे दुर्घटनेपासून 100 किलोमीटर अंतरावर अढळले आहेत. दापोलीतील केळशी वेळास किनाऱ्यावर जवळ दोन्ही मृतदेह सापडले आहेत.
13 ऑगस्ट रोजी दुसऱ्या जयगड-बोरीवली एसटीचा शोध लागला. ही एसटी पूलापासून 500 मीटर अंतरावर नौदलाच्या जवानांना आढळून आली. तर दुर्घटनेतील राजापूर-बोरीवली एसटी दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सापडली होती.