COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाड : महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलावर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एक उच्चपदस्थ व्यक्ती चक्क सेल्फी काढत असल्याची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. 
मुख्यमंत्र्यांच्या मागेच उभं राहून ही व्यक्ती सेल्फी काढतेय, याचा अर्थ सरकारमधली कोणीतरी वजनदार व्यक्ती असणार. 


भाजपाचे कार्यकर्ते या व्यक्तीला नक्कीच ओळखू शकतील, अशी कुजबुज सुरू आहे. सेल्फी काढणारी ही व्यक्ती कोण आहे, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.हे कृत्य संवेदनशील म्हणायचं का ? ही सेल्फी काढण्याची जागा आहे का ? हेच का सरकारला वाटलेलं घटनेचं गांभीर्य?असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीने सेल्फी काढताना आपण हात वर करून झुकवतो त्याप्रमाणे आहे, ही सेल्फी काढणारी व्यक्ती आपले दोन्ही हात वर करून सेल्फी घेत असल्याचं व्हिडीओवरून दिसतंय.