जानकर पुन्हा वादात, पक्षातल्या पद निवडीसाठी बोली लावली?

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
मुंबई : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी आपल्याच राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी पदासाठी बोली लावत असतानाचा महादेव जानकरांचा व्हिडिओ प्रसारीत झाला आहे.
राज्यस्तरीय कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या विविध पदांसाठीचा दर सांगतानाचा जानकरांचा व्हिडिओच समोर आला आहे. याआधी भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात जानकरांनी वादग्रस्त भाषण केलं होतं. या भाषणात जानकरांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर खालच्या शब्दांमध्ये टीका केली होती. यानंतर जानकरांना दिलगिरीही व्यक्त करावी लागली होती.