मुंबई : बँकेच्या डिजिटल तंत्रज्ञानातील त्रुटीचा फायदा घेत यूपीआयच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेला काही 'हायटेक' भामट्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. पण, नेमका कसा हा घोळ करण्यात आला... पाहुयात...


कशी झाली फसवणूक...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अ' नावाच्या व्यक्तीला यूपीआयच्या माध्यमातून 'ब' नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करायचे असल्यास त्याने 'यूपीआय'च्या माध्यमातून ट्रान्सफर केल्यास ते पहिले बँकेच्या पूल अकाऊंटमधून वजा व्हायचे आणि लगेच 'ब' नावाच्या व्यक्तीच्या नावे जमा व्हायचे आणि त्यानंतर 'अ' नावाच्या व्यक्तीच्या खात्यातून पूल अकाऊंटवर यायचे... पण 'अ' व्यक्तीच्या नावावर शून्य बॅलन्स असल्यानं ते पूल अकाऊंटवर आलेच नाही आणि हा सगळा प्रकार समोर आला... तांत्रिक त्रुटीमुळे हा प्रकार घडत होता. त्यातूनच हायटेत भामट्यांनी कोट्यवधींचा चुना लावला.


ऑनलाईन पेमेंट करताना यूपीआय अॅपमध्ये फक्त मोबाईल नंबरच्या माध्यमातून एक लाख रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करता येऊ शकत होते. त्यातूनच काही भामट्यांनी या प्रणालीचा अभ्यास करून नियोजीतपणे गंडा घातल्याचं उघडकीस आलंय. 


बँक अधिकाऱ्यांच्या मते यूपीआय प्रणाली सुरु झाल्यानंतर त्यात काही त्रुटी होत्या. त्यातून 1 डिंसेबर ते 18 जानेवारीच्या काळात हा घोटाळा झाल्याचं अधिकाऱ्यांनी नावं जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलंय.