उस्मानाबाद : कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी उस्मानाबाद शहरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन केलं होते. जिजाऊ चौकातून निघालेला हा मूक मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोर्चासाठी जिल्हा भरातून लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील महिला आणि तरुण वर्गानं उपस्थिती लावली. विशेष म्हणजे कोणतेही प्रस्थापित नेतृत्व नसताना स्वयंस्फूर्तीने ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव यात मोठ्या संख्येने यात सामील झाले. 


या मोर्च्यात  मराठा आरक्षण, औट्रोसिटी कायद्याचा गैरवापर थांबवण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधण्याची मागणी करण्यात आली.