मराठा मोर्चाला उत्तर देण्यासाठी दलित संघटना रस्त्यावर
कोपर्डी अत्याचारच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मात्र अशा संघटनांचा निषेध करत अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ प्रथमच दलित संघटना रस्त्यावर उतरली आहे.
जामखेड : कोपर्डी अत्याचारच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मात्र अशा संघटनांचा निषेध करत अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ प्रथमच दलित संघटना रस्त्यावर उतरली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात बौद्ध, भटके विमुक्त आणि दलित समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंलबजावणी करावी, अॅट्रॉसिटी कायद्याच्या गुन्ह्यांसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र न्यायालये स्थापन करावे आणि अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जाहिर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एवढेच नाही तर यावेळी कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशीही मागणी यावेळी दलित संघटनांच्यावतीने करण्यात आली.