सातारा : मराठा क्रांती मूक मोर्चा आज सातारा येथे होतोय. सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोर्चात  उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारेसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील मोर्चात सामील होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज या भव्य मोर्चासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय. सुरक्षेसाठी ४००० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. २० ठिकाणी cctv कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 


सातारा जिल्हा परिषद मैदानातून येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. सकाळी पहाटे पासून साताराच्या दिशेने वाहने रवाना होत आहेत. राज्यातील सर्वात मोठा मोर्चा होईल असा विश्वास आयोजकानी व्यक्त केलाय.