ठाणे : ठाणे शहरात आज मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.. आधीच्या सर्वच मोर्चांप्रमाणे हा मोर्चाही यशस्वी करण्याकरता आयोजकांनी जय्यत तयारी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन हात नाक्यापासून निघणारा हा मोर्चा, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला जाणार आहे. तिथे पाच तरुणींचं शिष्टमंडळ जिल्हाधिका-यांना निवेदन देतील. मोर्चा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी, ठाणे पोलिसांनी जंगी तयारी केली आहे. 


शंभरच्या आसपास वरिष्ठ अधिकारी आणि तब्बल ६०० हून जास्त पोलीस कर्मचा-यांसह, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, तसंच बीडीडीएस पथकांचाही समावेश आहे. त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे मार्गही बंद असणार आहेत. 


मोर्चा दरम्यान ठाणे पश्चिमेतल्या बस आगारातून एकही बस सोडली जाणार नाही. दरम्यान मोर्चासाठी रेल्वे विशेष 40 लोकल सोडणार आहे.