बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा मराठीचा झेंडा
बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकला आहे. महापौरपदी संज्योत बांदेकर यांची निवड झाली. बेळगाव महापालिकेत एकूण 32 नगरसेवक मराठी भाषिक आहे. ते विविध पक्षात विखुरलेले आहेत.
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकला आहे. महापौरपदी संज्योत बांदेकर यांची निवड झाली. बेळगाव महापालिकेत एकूण 32 नगरसेवक मराठी भाषिक आहे. ते विविध पक्षात विखुरलेले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीने या सर्वांना एकत्र आणण्यात यश मिळवलंय. महापालिकेवर मराठी झेंडा फडकेल असा विश्वास आधीच व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मराठी गटातून महापौर पदासाठी संज्योत बांदेकरांची निवड करण्यात आली.