सातारा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेच रक्षण करत असतांना, संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी संतोष महाडिक हे अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडले. महाडिक यांच्या पत्नीने त्यांच्या पार्थिवावर आपण स्वत: आणि मुलही आर्मीतच जातील, असे व्रत घेतलं होतं. तसे त्या फक्त बोलल्याच नाही तर खरच अवघ्या सहा महिन्यांतच ते त्या व्रत पूर्ण करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वाती महाडिक यांनी SSB (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) ची परिक्षा दिली. स्वाती महाडिक या ’21 पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये दाखल झाल्या आहेत. शहीदाची पत्नी म्हणून त्यांना कोणतीही सवलत देण्यात आली नाही. फक्त वयाच्या बाबतीत त्यांना सूट देण्यात आली आहे. आता त्या प्रशिक्षणकरिता चेन्नईला जाणार आहेत.


स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. लष्करात दाखल होण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी स्वाती महाडिक यांना वयाच्या बाबतीत सूट दिली.


देशसेवा, समाजप्रेम असलेल्या या वीरपत्नीने इतरांसमोर एक नवा आदर्शच ठेवला आहे. स्वाती यांना एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे.


संतोष महाडिक यांनी अनेकदा दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजविल्याबद्दल आणि पथकाचे उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल त्यांना सेनेतील पदकाने सन्मानित करण्यात आले होते.