खूशखबर ! पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे
म्हाडाच्या कोकण विभागानंतर आता पुणे विभागही घरांची लॉटरी काढणार आहे. पुण्यात 2283 घरांसाठीची जाहिरात येत्या मे महिन्यात काढली जाणार आहे.
पुणे : म्हाडाच्या कोकण विभागानंतर आता पुणे विभागही घरांची लॉटरी काढणार आहे. पुण्यात 2283 घरांसाठीची जाहिरात येत्या मे महिन्यात काढली जाणार आहे.
अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा यामध्ये समावेश असेल. पिंपरी चिंचवडमध्ये 833 तर म्हाळुंगेमध्ये 1450 घरे असून यांच्या किंमती सामान्यांना परवडतील अशा असतील असं म्हाडाच्या वतीनं सांगण्यात आलंय. सोलापुरातही 135 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे..
पुणे विभागासाठीही म्हाडाची लॉटरी
पुणे,म्हाडा, लॉटरी, घर, pune, house, sceme, good news, marathi news, mhada