माथेरान: माथेरानहून नेरळला जाणाऱ्या मिनी ट्रेनचा अपघात झाला आहे. या ट्रेनचा एक डबा दुपारी सव्वातीनच्या सुमारास रुळांवरून घसरल्यानं हा अपघात झाला. या डब्यामध्ये जवळपास 30 प्रवासी होते, सुदैवानं हे प्रवासी सुखरुप आहेत. अमन लॉज स्टेशनजवळ हा अपघात झाला. 


सुट्टयांचा सिझन सुरु झाला आहे, त्यातच रविवार असल्यानं माथेरानमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या अपघातामुळे प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला. तांत्रिक कारणांमुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.