रक्षकच बनला भक्षक... पोलिसानंच केला बलात्कार!
औरंगाबादच्या खुलताबादमध्ये रक्षकच भक्षकच बनल्याची धक्कादायक घटना घडलीय.
औरंगाबाद : औरंगाबादच्या खुलताबादमध्ये रक्षकच भक्षकच बनल्याची धक्कादायक घटना घडलीय.
खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुधाकर कोळी याने आठवीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
आपल्या घरी कुणी नसल्यानं फायदा घेत मुलीला घरी बोलवलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीनं केलाय. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली.
रात्री उशिरापर्यंत ती मुलगी घरी न आल्यानं तिच्या वडिलांनी शोधाशोध केली आणि पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर घरी पोहचलेल्या मुलीनं झाला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.
घडल्या प्रकाराबद्दल वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला असून सुधाकर कोळीला अटक करण्यात आलीय.