नागपूर : मार्चमध्ये बोर्डाच्या परिक्षा असल्याने राज्यात महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीतच होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी जे एस सहारिया यांनी नागपुरात दिली आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी सुरु करण्याच्या सूचना कलेक्टर आणि मनपा आयुक्तांना देण्यात आल्यात.. यांदाच्या निवडणूकीत दोन नव्या संकल्पना अमलात आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


 उमेदवारांचे नामनिर्देशपत्र आणि शपथपत्र संगणकाच्या माध्यमाने स्विकारण्यात येणार आहे. हस्तलिकखित नामनिर्देशपत्र चालणार नाही, त्यामुळे उमेदवारांचे अर्ज रद्द प्रमाण कमी होणार आहे. शिवाय उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्राचा गोषवारा वर्तमानपत्रात छापला जाईल. तसेच मनमा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्स लाऊन सर्व माहिती त्यावर छापली जाणार आहे.