पुणे :  पिंपरी चिंचवड शहरात अस्तित्व संपत आलेल्या मनसेचे नाव पुन्हा चर्चेत आलं. पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण सांगत शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली. त्यामुळं मनसेची ही अस्तित्वासाठी स्टंटबाजी तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार पैकी तीन नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षांची वाट धरल्यानंतर केवळ एकमेव नगरसेवक राहिलेल्या मनसेचे शहरातले अस्तित्व गेली कित्येक महिने जाणवत नव्हते. पण शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिखले यांच्या निगडी प्रभागात पाणी येत नसल्याने त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अ प्रभाग कार्यालयातले कनिष्ठ अभियंते सन्मान भोसले यांना मारहाण केली आणि मनसे पुन्हा त्यांच्या राडा संस्कृतीवर परत आली. 


या राड्यामुळं शहरात मनसेचे जोरदार चर्चा हे सुरु झाली. पण मनसेची ही स्टंटबाजी आहे आणि ती केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. चिखले यांनी मात्र ही स्टंटबाजी नाही तर लोकांसाठी आवाज उठवल्याचे स्पष्ट करतानाच मनसे ची सत्ता रस्त्यावरच आहे असं सांगत मारहाणीचे समर्थन केले.


दरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मारहाणीचा निषेध करत आंदोलन केले. असे प्रकार होऊ नयेत अशी अपेक्षा ही व्यक्त केली. आता ही मारहाण पिंपरी चिंचवडमध्ये मनसेला किती फायदेशीर ठरणार हे गुलदस्त्यात आहे.