मुंबई :  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर मनसेने चांगलेच तोंडसुख घेतले आहे. 
 
ठाण्यातील विविध कामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्यापूर्वी मनसेचे अविनाश जाधव यांनी जोरदार टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातल्या लोकांचे अभिनंदन.... गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरे यांना जाग आली.  भले मनसेची ठाण्यात सत्ता नाही, पण आमच्या पदाधिकाऱयांनी सुचवलेल्या कामांचे उद्घाटन उद्धव ठाकरे करीत आहेत, असा टोलाही जाधव यांनी लगावला. 


उद्धव ठाकरे यांना निवडणुकीपुरते ठाणे दिसते. आनंद दिघे यांच्या पुण्याईवर ते जगत आहेत, अशीही खोचक टीका त्यांनी केली 


ठाण्यात शिवसेनेचा दिखाऊपणाच जास्त  असल्याचे मनसे नेते अभिजित पानसे यांनी म्हटले आहे..  
क्लस्टरचा मुद्दा स्वतःच अनधिकृत बिल्डिंग बांधायच्या, स्वतःच FSI द्यायचा आणि क्लस्टर लावायाचे आणि श्रेय घ्यायचे असा आरोपीही पानसे यांनी केला. 


यांना दिवा डम्पिंग ग्राऊंड दिसत नाही कारण तिथे यांची मते नाहीत. राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवर समाजकारणाचे ढोंग आहे.
मनसेची नाशिकमधली विकासकामे आणि ठाण्यातली सेनेची फुटकळ कामे समोरासमोर ठेवा, दूध का दूध पानी का पानी होईल, असे आव्हानही पानसे यांनी दिले आहे.