पुणे : पुण्यात मनसेला जोरदार धक्का बसलाय. मनसेचे नगरसेवक रविंद्र धंगेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. मुंबईत काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी पक्षाच्या बैठकीनंतर प्रवेश करणार. धंगेकर मनसेचे माजी गटनेते आहेत. त्यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूकही लढवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी धंगेकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची गेले कित्येक दिवस चर्चा होती. मात्र त्यांना स्थानिक आमदार तसेच पालकमंत्री गिरिश बापट त्याचप्रमाणे भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांचा पक्षप्रवेश लटकला होता. 


अशा परिस्थितीत धंगेकरांवर ना घरका ना घाटका अशी अवस्था ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर धंगेकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आता त्यांना काँग्रेसकडून तरी उमेदवारी मिळते का याबद्दल उत्सुकता आहे