निवडणुकीत सोनाली बेंद्रेचा पराभव

ठाणे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. या महापालिकेत मनसेच्या एकाही उमेदवाराला यश मिळवता आले नाही.
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. या महापालिकेत मनसेच्या एकाही उमेदवाराला यश मिळवता आले नाही.
या पराभवासोबतच ठाण्याच्या प्रभाग क्र १६ बमधील मनसेकडून निवडणूक लढवलेल्या सोनाली प्रभाकर बेंद्रे चर्चेचा विषय ठरला होता. अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि यांचे नाव सारखेच असल्याने निवडणुकीत त्यांच्या निकालाबाबत साऱ्यांनाच उत्सुकता होती.
मात्र या निवडणुकीत सोनाली बेंद्रेचा शिवसेनेच्या शिल्पा वाघ यांनी पराभव केला. मतदारांनी बेंद्रे यांच्याऐवजी शिवसेनेच्या शिल्पा वाघ यांना निवडून दिले.