बोरगाव : पाण्याच्या शोधात आलेले माकड लोकांना पाहून घाबरले आणि ते सैरावैरा पळू लागले. मात्र, त्याला काही पाणी मिळाले नाही. या माकडाचा दुदैवी अंत झाला. उपस्थित ग्रामस्थ हळहळले. त्यांनी मृत माकडाची अंत्ययात्रा काढली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरगाव ता. अक्कलकोट येथे एक माकड पाण्याच्या शोधात आले. मात्र ग्रामस्थांना पाहून ते भयभीत झाले. या घरावरून त्या घरावर, झाडावर उड्या मारू लागले. याच दरम्यान विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला त्याचा धक्का लागला. विजेचा शॉक लागून ते जागीच गतप्राण झाले. 


ग्रामस्थांनी त्याची अंत्ययात्रा काढण्याचे ठरविले. हे वृत्त गावात पसरताच या माकडाच्या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला. इंदिरानगर येथून शुक्रवारी सकाळी या माकडाची अंत्ययात्रा निघाली़. अख्ख गाव अंत्ययात्रेसाठी लोटले होते. 


माकडाला विधीवत स्नान घालून, सर्व विधी केलेत. साडी-चोळी, काकण असा संपूर्ण आहेर करून पुष्पहार घालून सजवलेल्या ट्रॅक्टरमधून सवाद्य अंत्ययात्रा काढण्यात आली़. गावातील मारूती मंदिर येथे त्याचे दफन करण्यात आले.