कोकणात अतिवृष्टीचा इशारा
मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस होईल. त्याचवेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
मुंबई : मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस होईल. त्याचवेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
कोकणात १७ जूनपासून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे पुमे हवामान विभागाने म्हटलेय.
१० जूननंतर मान्सून कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी व्यापली असून पुढे कूच करत आहे. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. या स्थितीमुळे पावसाला जोर मिळणार आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील केरळ, कर्नाटकसह कोकणात पावसाचा जोर वाढण्यास मदत होईल. तसेच मराठवाड्यातही पाऊस बरसण्यास सुरवात होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय.