मुंबई : महाराष्ट्रात मान्सून विदर्भाच्या वाटेने दाखल झालाय. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वच जण ज्याची चातकाप्रमाणे वाट पहाताहेत तो मान्सूनचा पाऊस पुढच्या ४८ तासांत सक्रीय होतोय, असा अंदाज कुलाबा वेधशाळेचे संचालक व्ही के राजीव यांनी वर्तवलाय.


गोवा, कोकण, मध्य महाष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात पुढील ४८ तासांत मान्सून दाखल होणार आहे. असाही अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय. 


यावर्षी मान्सूनचं आगमन केवळ कोकणातच नाही तर एकाच वेळी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनीही पेरणीची तयारी करावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.