आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी
नाशिकच्या देवळा तालुक्यातील काचने गावाने आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी गेला आहे. पाणीटंचाईमूळे दुसऱ्याच्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तिघा मायलेकरांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. काचने गावात दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील शेतमजूर लक्ष्मीबाई गांगुर्डे त्यांची मुलगी रेणुका आणि मुलगा अनिलला घेऊन कपडे धुण्यासाठी कनकापुर शिवारातील एका विहिरीवर गेल्या होत्या.
नाशिक : नाशिकच्या देवळा तालुक्यातील काचने गावाने आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी गेला आहे. पाणीटंचाईमूळे दुसऱ्याच्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तिघा मायलेकरांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. काचने गावात दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील शेतमजूर लक्ष्मीबाई गांगुर्डे त्यांची मुलगी रेणुका आणि मुलगा अनिलला घेऊन कपडे धुण्यासाठी कनकापुर शिवारातील एका विहिरीवर गेल्या होत्या.
विहिरीतील पाणी ओढताना अनिलचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला त्याला वाचविण्यासाठी लक्ष्मीबाई आणि रेणूकानेही पाण्यात उडी घेतली. या घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या त्यांचे वडील विष्णू गांगुर्डे यांच्या हा प्रकार लक्षात आला.