...म्हणून आईनं दीड वर्षाच्या मुलीला विष पाजलं!
जन्मदात्री आईच आपल्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीय. पती-पत्नीच्या वादात एका दीड वर्षांच्या चिमुरडीचा जीव गेलाय.
पुणे : जन्मदात्री आईच आपल्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीय. पती-पत्नीच्या वादात एका दीड वर्षांच्या चिमुरडीचा जीव गेलाय.
पुण्यामध्ये वारजे इथं ही घटना घडलीय. एका आईनेच आपल्या मुलीला विष पाजून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
पती वेळ देत नाही म्हणून निराश झालेल्या या महिलेनं आपल्या दीड वर्षांच्या मुलीला विष पाजलं. त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला.
यात महिला बचावली असली तरी मुलीचा मात्र बळी गेलाय.