नागपूरमध्ये आईकडूनच मुलीची हत्या
मुलीनं चूक केली म्हणून सगळ्या कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीनं जन्मदात्या आईनं स्वतःच्याच 22 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडलीये
नागपूर : मुलीनं चूक केली म्हणून सगळ्या कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीनं जन्मदात्या आईनं स्वतःच्याच 22 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडलीये
अंकिता मेश्राम या 22 वर्षीय युवतीनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता उघड झालेल्या माहितीतून पोलिसांनाही धक्काच बसला. मुक्ताबाईनंच पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केला होता.
अंकिताचं एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून अंकिता गरोदर राहिली. हा सारा प्रकार मुक्ताबाईला कळल्यानंतर तिचा अंकितासोबत वाद झाला. या वादातूनच मुक्ताबाईनं अंकिताची हत्या केली.
समाजात परिवाराची बदनामी होईल म्हणून हे हत्याकांड घडलं. या घटनेतूंन आई वडिलांनीच नाही तर मुलांनी सुद्धा बोध घेण्याची गरज आहे.