मुंबई-नाशिक वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
नाशिक जिल्ह्यातील चिमुरडीवरील अत्याचाराविरोधातील, रास्तारोको आंदोलन मध्य रात्रीनंतर थांबवण्यात आलं आहे. यानंतर सकाळी मुंबई-नाशिक वाहतूक पूर्वपदावर येत आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चिमुरडीवरील अत्याचाराविरोधातील, रास्तारोको आंदोलन मध्य रात्रीनंतर थांबवण्यात आलं आहे. यानंतर सकाळी मुंबई-नाशिक वाहतूक पूर्वपदावर येत आहे.
मुंबई-नाशिक वाहतूक सुरू झाल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. कारण दोन्ही बाजूंनी वाहतूक २४ तासापासून बंद होती.
जिल्ह्यातील एकूण ६ मार्ग बंद होते. दरम्यान, पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला असून आंदोलकांना समजावून, महामार्ग मोकळा करण्यास पोलिसांना यश आले आहे, यामुळे नाशिक जिल्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
आंदोलनात सर्वात जास्त फटका हा एसटी गाड्यांना आणि पोलिसांच्या गाड्यांना बसला आहे. यानंतर खासगी वाहनांचीही जाळपोळ झाली आहे.