लोणावळा : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे १९ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यारी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई - पुणे एक्सप्रेस वे १९ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. २२ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान एक्सप्रेस बंद असणार आहे. सुट्टीचे दिवस सोडून इतर दिवशी काम होणार आहे. 


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईहून पुण्याकडे येणारी एक लेन अमृतांजन (अमृतांजन पूल) परिसरात येत्या २२ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. सुमारे तीनशे मीटरचे हे अंतर असून, या ठिकाणी नेट बोल्टिंग, लुझ स्केलिंग आणि बोल्ट फिटिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने  (एमएसआरडीसी) कळविण्यात आले आहे. केवळ एक लेन आणि तिही केवळ ३०० मीटरची लेन बंद राहणार आहे.