भंडाऱ्यात पालिका निवडणूक वादातून धारधार शस्त्राने हल्ला
जिल्ह्यात नुकत्याच नगर परिषद निवडणूक आटोपल्या असून कही खुशी कही गम असं चित्र शहारात दिसत आहे. आता एकमेकांच्या विरोधात निवडणुकीचा रिंगणात लढलेले उमदेवार आता एकमेकांवर राग काढताना दिसत आहेत.
भंडारा : जिल्ह्यात नुकत्याच नगर परिषद निवडणूक आटोपल्या असून कही खुशी कही गम असं चित्र शहारात दिसत आहे. आता एकमेकांच्या विरोधात निवडणुकीचा रिंगणात लढलेले उमदेवार आता एकमेकांवर राग काढताना दिसत आहेत.
वॉर्ड क्रमांक 12 मधून मकसूद खान अपक्ष उमेदवार म्हणून निवडूण आले. त्याच वार्डातून पराभूत झालेले हाजी मोहम्मद मुश्ताक याच्यासोबत त्याचा जुना वाद होता. आणि याच वादातून हाजी मोहम्मदचा भाऊ राजू पटेल आणि त्याचा मित्र नईमला एकटं पाहून त्यांच्यासोबत वाद केला.
तसेच धारधार शस्त्राने त्यांचावर हल्ला चढवला. या हल्ल्यात राजू पटेल आणि नईम जखमी झाले. हि बातमी दोन्ही गटांना कळल्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. यामुळे शहरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांची समजूत काढली.