नागपूर : ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी यांनी शनिवारी संध्याकाळी, सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेतली. तब्बल दीड तास ही चर्चा झाली.


बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह एकूण १३ नेत्यांविरुद्ध खटला चालवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायलयानं दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुरलीमनोहर जोशी यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. दरम्यान शहरातल्या एका तारांकीत हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या जोशींना या भेटीबाबत विचारला असता त्यांनी बोलायला नकार दिला.