विकास भोसले, सातारा : साताऱ्यातल्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदेंसमोर काँग्रेस आणि भाजपनं आव्हान उभं केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदेंची कोरेगाव नगर पंचायत निवडणूक जिंकण्याची मोठी धडपड सुरूय. विकासाच्या मुद्यावर आमचा विजय निश्चित असल्याचं मत शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलंय. 


मात्र, राष्ट्रवादीसमोर काँग्रेसचे किशोर बाचल आणि किरण बर्गे यांनी मोठं आव्हान दिलंय. कोरेगाव स्मार्ट सिटी करण्यासाठी भाजपला निवडून देण्याचं आवाहन भाजप करतेय. महेश शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली भाजपा निवडणूक रिंगणात उतरलीय. तर शिवसेना आणि मनस्थिती या पक्षांनी देखील स्वबळावर उमेदवार उभे केलेत. नव्यानं नगरपंचायत झाल्यानं अनेक अपक्ष रिंगणात आहेत.  


कोरेगाव शहराच्या विकासासाठी रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तिळगंगा नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न अजूनही कायम आहे. विशेषत: शहरातील वाहतुकीची समस्या मोठी आहे. या समस्या सोडवण्याचं आश्वासन सर्वच राजकीय पक्षांनी दिलंय. मात्र कोरेगावचे मतदार कुणाच्या पारडयात मत टाकतात ते लवकरच कळेल.