नागपूर : राजकारणानं खालची पातळी गाठल्याची घटना नागपूरमध्ये पाहायला मिळाली आहे. निवडणुकींचं तिकीट वाटप करताना काँग्रेसनं भाजपशी सौदा केल्याचा आरोप होत आहे. अशोक चव्हाण, विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे आणि अभिजीत वंजारी यांच्या राजकीय निधनाच्या तेराव्याची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे.


ही निमंत्रण पत्रिका नेमकी कोणी छापली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान तेराव्याच्या पत्रिका छापणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. काँग्रेस कार्यकर्ते असले उद्योग करत नसून त्यांच्यावर असे संस्कार नसल्याचेही चव्हाण म्हणाले.