नागपूर : दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने म्हटले आहे, 'नागपूर ही संघभूमी नसून, दीक्षाभूमी आहे, संघभूमी म्हणून नागपूरला बदनाम केले जात आहे'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कन्हैया कुमारने आपल्याला नागपूरला येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. १४ एप्रिलला आपण नागपूरला येतच राहणार, असेही सांगितले. 


देशातील शोषितांवर, वंचितांवर अन्याय होत असल्याचे त्यांना जाणवू लागले आहे, म्हणून आता आझादीच्या घोषणा देण्यात येत असल्याचे कन्हैया यावेळी म्हणाला. 


आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्याने सांगितले. कन्हैयाने दीक्षाभूमीवर जाऊन जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनही केले. 


कन्हैय्याच्या गाडीवर दगडफेक


दरम्यान, कन्हैया कुमार यांच्या गाडीवर गुरुवारी सकाळी नागपूरमधील विमातळाबाहेर दगडफेक करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे, पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे.