नागपूर : नागपुरात सर्वत्र शांततेत मतदान पार पडत असताना शेवटी मतदान प्रक्रियेला गालबोट लागलंच. घनश्याम चौधरी या भाजप शहर उपाध्यक्षाला जबरदस्त मारहाण करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी आपल्या समर्थकांसह आपल्याला मारहाण केल्याचा आरोप, घनश्याम चौधरी यांनी केला आहे.


हिलटॉप परिसरात मतदान संपल्यानंतर सुमारे ५० ते ६० जणांनी घेरून मारल्याचं घनश्याम चौधरी यांनी सांगितलंय. तसंच वाहनाची तोडफोड करत सहका-यालाही मारहाण केल्याचं चौधरींनी म्हंटलंय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय.