बीड : पंकजा मुंडेंनंतर आता भगवानगडचे महंत नामदेव स्वामी यांचीही ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यातली भाषा एखाद्याला महंताला न शोभणारीच आहे. मी फाडून खाईन, मी तयारीत आहे, माणसं थांबवली आहेत, अशा शब्दांत विरोध करणाऱ्यांना इशारा देण्याची भाषा महंत वापरात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या भाषणाला परवानगी द्यावी यासाठी आपल्यावर अहमदनगरच्या पत्रकाराकडून दबाव टाकण्यात येत होता आणि त्याला दिलेलं उत्तर म्हणजे ही क्लिप असल्याचं भगवानगडचे महंत नामदेवशास्त्री यांनी म्हटलं आहे. तसंच या क्लिपचा आपल्याला अभिमान असल्याचंही त्यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलंय.


पाहा काय म्हणाले नामदेव शास्त्री