ठाणे : काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी मारहाण केल्याचा आरोप करणारे काँग्रेस चिपळूणमधील पदाधिकारी संदीप सावंत यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी आज भेट घेतली. आपण सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावंतबरोबर आमचे घरचे संबंध आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांनी मारहाण केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, अशी अपेक्षा राणेंनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी नीलेश राणेंविरोधात आवाज उठविण्याचे म्हटले होते. वेळप्रसंगी सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. आज दुसऱ्या दिवशी राणे यांनी भेट घेतल्याने चर्चा झडत आहे.