रत्नागिरी : विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात का होईना काँग्रेस नेते नारायण राणेंनी हजेरी लावली. नारायण राणे आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावर्डे गावात संघर्ष यात्रेत सहभाग घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैयक्तिक कामामुळं सुरूवातीला संघर्ष यात्रेला हजर राहू शकलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला. यावेळी त्यांनी युती सरकारसह शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. 


चौथ्या टप्प्यातल्या संघर्ष यात्रेला रायगडावरील मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सुरुवात झाली. शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, तूर खरेदी, दानवेंचं वादग्रस्त विधान अशा विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारवर तोफ डागलीय. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नसल्याचं सांगत कौतुक केलं.