`दुसऱ्याच्या बाथरूममध्ये पाहण्यापेक्षा जनतेकडे पाहा`
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये सगळ्याच पक्षाचे बडे नेते एकमेकांवर विखारी टीका करत आहेत.
औरंगाबाद : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये सगळ्याच पक्षाचे बडे नेते एकमेकांवर विखारी टीका करत आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या अशाच एका प्रचारसभेमध्ये काँग्रेस नेते नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.
मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका योग्य नाही. मोदी मनमोहन सिंग यांच्या बाथरूममध्ये कधी गेले होते. दुसऱ्याच्या बाथरूममध्ये पाहण्यापेक्षा जनतेकडे पाहा, असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे. याबरोबरच राणेंनी राज्यातल्या भाजप-शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या वादावरही टीका केली आहे.
राणेंच्या भाषणातील महत्तावाचे मुद्दे
सेना - भाजपाची गम्मत जम्मत पहात असाल, असे पहिले मुख्यमंत्री आहे जे खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात
25 वर्ष एकमेकांचं मंगळसूत्र घालून फिरत होते, आज काय सूरु आहे, दोन्ही पक्ष भ्रष्ट आहेत
आमचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या झाल्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी फडणवीस करत होते. आज घ्या स्वतःवर गुन्हे दाखल करून
भाजपा उमेदवारांची गुन्हेगारी बघून घेतात आणि त्याप्रमाणे तिकीट देतात
नोटा बंदी मुळे 400 अतिरिक्यांनी सरेंडर केलं म्हणे, कोणालाच माहिती नाही रावसाहेब दानवेंना स्वप्न पडले का?
निवडणूक आली की राम आठवतो महाराज आठवतात जनता का आठवत नाही
भाजपा सरकार जातीवादी आहे. आल्या आल्या मुस्लिम आरक्षण रद्द केलं, भाजपा सेना सत्तेत असे पर्यंत मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही