पुणे : पुण्यातल्या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आधीच्या काँग्रेस सरकारवर तुफानी हल्लाबोल केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1988 मध्येच बेनामी संपत्ती कायदा संसदेत मंजूर होऊनही, तत्कालीन सरकारनं जाणीवपूर्वक तो कायदा लागू केला नाही. आधीच्या सराकरच्या नाकर्तेपणामुळेच देशातल्या जनतेला त्रासाला सामोरं जावं लागल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला. मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे व्यासपिठावर असतानाच मोदींनी ही टीका केली आहे.


पुण्यात याधीच मेट्रो झाली असती तर बरं झालं असतं. खर्च कमी झाला असता, पण आधीच्या सरकारने माझ्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी करायच्या ठेवल्या आहेत, असं म्हणत पंतप्रधानांनी शरद पवारांना आणखी एक टोला हाणला.