नाशिक जिल्हा बँक - महावितरण कंपनी यांच्यात संघर्ष
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महावितरण कंपनी यांच्यातला संघर्ष आता वाढण्याची चिन्हं आहेत.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महावितरण कंपनी यांच्यातला संघर्ष आता वाढण्याची चिन्हं आहेत.
महावितरण कंपनीच्या ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा बँकेता केला होता. ती ३३ कोटी २२ लाखांची रक्कम बँकेने वर्ग न केल्याची तक्रार महावितरणने केली होती.
मात्र पैसे वर्ग करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी असताना बँकेवर गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे असं सांगत महावितरणवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा बँकेच्या अध्यक्षांनी दिलाय.