नाशिक : महानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्शभूमीवर प्रभाग रचनेची सोडत आज काढण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आरक्षण सोडतीत जवळपास अनेक विद्यामान नगरसेवकांना धक्का  बसलेला नाही. अनेकांची प्रभाग सुरक्षित असल्याचे दिसत आहे. मात्र, कोणाला तिकिट द्यावे, याची राजकीय पक्षांना डोकेदुखी आहे. तिकीट वाटपाच्या वेळी एकाच जागेसाठी अनेक तुल्यबळ उमेदवार हक्क सांगणार असल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे.


आज काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशांसुसार चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यानुसार ३१  प्रभागात १२२ जागा सामावून घेण्यात आल्यात. त्यापैकी नागरिकांचा मागासवर्ग, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिला पुरुश्साठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. १२२ पैकी ६० जागा राखीव प्रवर्गासाठी राखीव आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.


६२ जागा सर्वसाधारण उमेदवारासाठी अर्थात खुल्या प्रवर्गासाठी आहेत. त्यापैकी ३० जागा महिलांना देण्यात आल्यात. ओबीसी गटासाठी ३३ जागा राखीव असून १७ जागांवर महिलांना संधी मिळणार आहे. तर उर्वरित १६ जागांवर महिला किंवा पुरुष अशा दोघांना संधी आहेत. अनुसूचित जमातीसाठी ९ जागा राखीव असून ५ जागावर केवळ महिलाराज राहणार आहे. ४ जागा पुरुषांसाठी आहे. अनुसूचित जातीसाठी १८ जागा असून ९ जागा महिलांसाठी राखीव ठेण्यात आल्या आहेत. पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार आहे.


प्रभागानुसार आरक्षण